बातम्या
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
By nisha patil - 4/15/2025 4:09:58 PM
Share This News:
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गृह, महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाशी संबंधित एकूण 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागात तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, 1965 मधील महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्तांवरील थकीत करासाठी दंड अंशतः माफ करून करवसुली सुलभ करण्यासाठी 'अभय योजना' लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
याशिवाय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
या निर्णयांमुळे प्रशासनिक कार्यवाही अधिक गतिमान होणार असून, करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
|