बातम्या
दर्डेवाडीजवळ चार चाकींची समोरासमोर धडक, पाच जण जखमी
By nisha patil - 11/15/2026 10:53:51 PM
Share This News:
दर्डेवाडीजवळ चार चाकींची समोरासमोर धडक, पाच जण जखमी
**आजरा(हसन तकीलदार)*आजरा तालुक्यातील दर्डेवाडी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.
दि. १४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी ऍड. तुकाराम पांडुरंग राजे हे कुटुंबीयांसोबत आंबोली मार्गे शिरोळकडे जात होते. त्यांची नेक्सॉन कार दर्डेवाडी फाट्याजवळ आली असता समोरून येणाऱ्या इन्नोव्हा गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून नेक्सॉन कारला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात नेक्सॉन कारमधील स्नेहल राजे, मयूर कातकर, निर्मला कातकर, तेजस्विनी कांबळे आणि आर्यन यांच्यासह पाच जण जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी इन्नोव्हा चालक निलेश बाबासो नादुले, रा. कागलपार्क, ता. करवीर याच्याविरोधात आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून सहाय्य्क पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.
दर्डेवाडीजवळ चार चाकींची समोरासमोर धडक, पाच जण जखमी
|