विशेष बातम्या
पन्हाळगडावर भर पावसात धुक्याच्या लहरी मध्ये 79 स्वातंत्र्यदिन उत्साहात पार,
By nisha patil - 8/15/2025 2:52:31 PM
Share This News:
पन्हाळगडावर भर पावसात धुक्याच्या लहरी मध्ये 79 स्वातंत्र्यदिन उत्साहात पार,
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर, आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन. आजच्याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा ऐतिहासिक, सुवर्णदिन देशभरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अवघा देश तिरंगी रंगात न्हावून निघाला आहे.
पन्हाळगडावरील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, या गडावरील ऐतिहासिक इमारती तिरंगी विद्युत रोषणाईने उजळया आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आज भर पावसात धोक्याच्या लहरीमध्ये पन्हाळगडावरील कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर,अंगणवाडीतील लहानबालक, पन्हाळा विद्यामंदिर विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या शाळेत साडेसात वाजता ध्वजावंदन करण्यात आले , तसेच गडावरील दुय्यम निबंध कार्यालय, तहसीलदार कार्यालय ,उपविभागीय अधिकारी कार्यालय , पोलीस स्टेशन, पंचायत समिती ,सर्व शासकीय कार्यालयात,ध्वजावंदन करण्यात आले. मग सर्व शाळेतील मुले साडेआठच्या दरम्यान प्रभात फेरी गावातून बस स्थानक इथून तिकटी मधली गल्ली मार्गे सज्जाकोटी या दिशेने रवाना झाली.
परंपरेप्रमाणे सज्जाकोटी या ठिकाणी मा. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत, देशभक्ती गीत गाणी, विद्यार्थ्यांकडून भर पावसात सादर करण्यात आले. कुमार विद्या मंदिर पन्हाळा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सरदार गायकवाड शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लेझीमचा खेळ या ठिकाणी दाखवण्यात आला,
यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, तहसीलदार विजय जाधव,रोहिणी गायकवाड, भारतीय पुरातत्त्वाचे, सागर गवडी ,अशपाक गारदी, पन्हाळा नगरपरिषद मुख्याधिकारी, चेतनकुमार माळी,पंचायत समिती गटविकास अधिकारी,सोनाली माडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संजय बोबले, पोलीस उपनिरीक्षक,सलीम शेख,महेश कोंडुभैरी, पोलीस कॉन्स्टेबल ,सचिन पाटील, तोसिफ मुल्ला, गणेश पाटील, इ.उपस्थित होते,
तसेच गडावरी नागरिक, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सज्जाकोटी या ठिकाणी ध्वजावंदन साठी उपस्थित होत्या, अमोल काशीद यांनी सूत्रसंचालन,व आभार मानले. व कार्यक्रम संपला असे जाहीर केले,
पन्हाळगडावर भर पावसात धुक्याच्या लहरी मध्ये 79 स्वातंत्र्यदिन उत्साहात पार,
|