बातम्या

धरणात ८५ टीएमसी पाणी, तरी कृष्णा कोरडी! राजू शेट्टींचा नदीपात्रात ठिय्या!

85 TMC of water in the dam


By nisha patil - 10/24/2026 2:14:48 PM
Share This News:



धरणात ८५ टीएमसी पाणी, तरी कृष्णा कोरडी! राजू शेट्टींचा नदीपात्रात ठिय्या!

कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भिलवडी येथे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. कोयना धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा असतानाही कृष्णा व कोयना नदीत पाणी सोडले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वाळविण्यासाठी आणि साखर कारखाने लवकर सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. कृष्णा नदीकाठच्या गावांमध्येही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी न सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. धरणात मुबलक पाणीसाठा असताना नदीपात्र कोरडे का, असा सवाल उपस्थित करत कृष्णा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली.


धरणात ८५ टीएमसी पाणी, तरी कृष्णा कोरडी! राजू शेट्टींचा नदीपात्रात ठिय्या!
Total Views: 16