बातम्या
पशुधन विम्यावर मिळणार ८५ टक्के अनुदान; १० जनावरांना विमा संरक्षण
By nisha patil - 10/26/2026 7:31:42 PM
Share This News:
पशुधन विम्यावर मिळणार ८५ टक्के अनुदान; १० जनावरांना विमा संरक्षण
राज्यातील पशुपालकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जनावरांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे पशुपालकांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना लागू केली आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विम्याच्या हप्त्यावर तब्बल ८५ टक्के अनुदान केंद्र आणि राज्य शासनाकडून दिले जाणार आहे. त्यामुळे पशुपालकांना विमा हप्त्यापैकी केवळ १५ टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, एका कुटुंबातील दहा जनावरांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकणार आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम पशुपालकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गाय आणि बैलांसाठी प्रत्येकी ७० हजार रुपये, तर म्हैस आणि रेड्यांसाठी प्रत्येकी ८० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
त्यामुळे जनावरांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक संकटापासून पशुपालकांना संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
पशुधन विम्यावर मिळणार ८५ टक्के अनुदान; १० जनावरांना विमा संरक्षण
|