बातम्या
जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
By nisha patil - 10/30/2026 9:10:14 PM
Share This News:
**जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट*
**आजरा(हसन तकीलदार)*:-जनता सहकारी गृहतारण संस्थेकडे 135 कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. यात कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. हे लक्षात घेऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 16.66 म्हणजेच दोन पगार, ड्रेस कोड, दिवाळी फराळ आणि साहित्य भेट म्हणून देताना विशेष आनंद आणि समाधान असल्याची भावना संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केली.
अत्यंत खडतर परिस्थितींवर मात करून, सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या संस्थेने ठेवी आणि कर्जाचे योग्य प्रमाण राखत अनेकांची घरांची स्वप्ने पूर्ण केलेली आहेत. संस्था नावारूपाला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भविष्यात आपल्या संपूर्ण क्षमतांचा वापर करावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रा. डॉ.अशोक बाचुळकर यांनी याप्रसंगी केले.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दोन महिन्यांचा पगार, दोन ड्रेसकोड, भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणेत आल्या. यावेळी संचालक रवींद्र आजगेकर, प्रा. डॉ.तानाजी कावळे, प्रशासकीय अधिकारी मारूती कुंभार,शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आभार प्रकट करताना मॅनेजर मधुकर खवरे यांनी सांगितले की, संचालक मंडळाने नेहमीच कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेतले आहे. त्यांनी दिलेली भेट आम्ही आनंदाने स्विकारून संस्थेच्या प्रगतीसाठी एक दिलाने काम करू असे सांगितले.
जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
|