शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राईव्हमधून ९ विद्यार्थ्यांची एनजिन बायोसायन्समध्ये निवड
By nisha patil - 5/16/2025 3:15:30 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राईव्हमधून ९ विद्यार्थ्यांची एनजिन बायोसायन्समध्ये निवड
कोल्हापूर,– श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी प्लेसमेंट सेलमार्फत आयोजित प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी (एंटायर) 2024-25 बॅचमधील एकूण ९ विद्यार्थ्यांची निवड पुणे येथील एनजिन बायोसायन्स फार्मा कंपनीमध्ये झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 2.80 लाख वार्षिक पॅकेज (LPA) चे आकर्षक वेतनमान मिळाले असून, त्यांच्या या यशाचे महाविद्यालयात स्वागत करण्यात आले.
या यशामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, तसेच अंतर्गत मूल्यांकन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण, तसेच डॉ. संजय लठ्ठे, प्रा. संजय थोरात, डॉ. राजश्री पाटील, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. विजय पुजारी, प्रा. एस. जी. कुलकर्णी, डॉ. सलमा मुल्ला, डॉ. आशुतोष उपाध्ये, डॉ. अभिजीत कासारकर, प्रा. वृषाली मिसाळ, आणि प्रबंधक श्री. सचिन धनवडे यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
विवेकानंद कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राईव्हमधून ९ विद्यार्थ्यांची एनजिन बायोसायन्समध्ये निवड
|