बातम्या
पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांचा खात्मा...
By nisha patil - 7/5/2025 4:18:32 PM
Share This News:
पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांचा खात्मा...
ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी तळांवर अचूक हल्ला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तानातील आणि PoKमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई पार पडली. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथील तळांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या हल्ल्यांची कबुली दिली असून, प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांचा खात्मा...
|