बातम्या
दोनवडीत साकारले २० व्या शतकातील खेडे
By nisha patil - 9/25/2026 7:48:08 PM
Share This News:
दोनवडीत साकारले २० व्या शतकातील खेडे
साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव; तरुणाने तयार केला देखावा
कागल प्रतिनिधी अजित बोडके कसबा बीड, ता. १६ : दोनवडी (ता. करवीर) ही दुर्गम वाडी, सातोरी डोंगरावर वसलेले जेमतेम ४०० लोकवस्ती असलेले गाव आहे. येथील सर्जेराव पाटील यांनी बनविलेल्या साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव पाहण्यासाठी गर्दी होत आहे. त्यांनी विसाव्या शतकातील खेड्यातला गणेशोत्सव कसा होता, या विषयावर मातीच्या चिखलापासून बनविलेला दोनवडीचा देखावा साकारला आहे.
श्री. पाटील यांना गरीबीमुळे शिक्षणही पूर्ण करता आले नाही. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. गाव दुर्गम भागात असल्यामुळे प्रगत तंत्रज्ञानापासून ते दूरच होते; पण अंगभूत असलेल्या कलेला त्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी त्यांनी मातीपासून लहान मानवी पुतळे, गाव वेस, ग्रामपंचायत कार्यालय, बैलगाडी, शेतकरी कुटुंब, त्यांचे राहणीमान, डॉक्टर, मेडिकल याची हुबेहूब मांडणी केली आहे. पूर्वी गाव कसे असायचे, याचे उत्तम उदाहरण देण्यासाठी त्यांनी गणेश आगमनासाठी झांजपथकाची छबी रेखाटली आहे. शिवाय गावगाड्यातील छोटे-मोठे समाजघटक कलेतून साकारले आहेत. त्यांची ही कला पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यातून पर्यटक येतात.
गेल्यावर्षी त्यांच्या देखाव्याची दखल मुंबई येथील जाणीव ट्रस्ट या संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले होते. यावर्षी ही त्यांनी मुंबई येथे होणाऱ्या गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
दोनवडीत साकारले २० व्या शतकातील खेडे
|