बातम्या

 स्वामी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमांचा दीपोत्सव! निराधारांसोबत साजरी केली दिवाळी!

A Festival of Lights Deepotsav through


By nisha patil - 10/11/2026 3:47:58 PM
Share This News:



 स्वामी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमांचा दीपोत्सव! निराधारांसोबत साजरी केली दिवाळी!

  प्रतिनिधी अजित बोडके  दीपावलीचे औचित्य साधत स्वामी प्रतिष्ठान, कोवाडे यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यामध्ये युवा व जनजागृती कार्यक्रम, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि शिवप्रेमींसाठी स्वराज्य गड-किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

९ नोव्हेंबर रोजी झालेल्या युवा व जनजागृती कार्यक्रमात वैशाली वडवळेकर, रविंद्र गुडगुळेकर, नंदकुमार देसाई, गुरुदेव साबळे आणि सुरेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण, व्यसनमुक्ती, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, उद्योजकता, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि पालकांची जबाबदारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, कोवाडे-दाभेवाडी परिसरातील निराधार महिला आणि पुरुषांना दीपावली फराळाचे वाटप करून प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली. सर्व स्पर्धांना महिला, विद्यार्थी आणि शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश देसाई यांच्यासह सर्व सदस्यांनी या उपक्रमांच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

 


 स्वामी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमांचा दीपोत्सव! निराधारांसोबत साजरी केली दिवाळी!
Total Views: 22