राजकीय

ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला नवी दिशा; मंत्री हसन मुश्रीफ यांची शिवारफेरी

A I Technology gives new direction to sugarcane farming Minister Hasan Mushrifs visit


By nisha patil - 5/30/2026 11:27:52 AM
Share This News:



ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला नवी दिशा; मंत्री हसन मुश्रीफ यांची शिवारफेरी


करनूरमध्ये ऊस शेतीवरील ए.आय. कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनवाढीचा मंत्र; ५०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करनूर : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्पादनवाढीच्या आधुनिक पद्धतींची माहिती देण्यासाठी करनूर येथे चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने हा उपक्रम राबविला.


यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसमवेत शिवारफेरी करून ऊस पिकांची पाहणी केली. चर्चासत्रात ऊस पिकातील आधुनिक प्लॉट विकास, ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळा व चर्चासत्राला ५०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास ऊस उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला नवी दिशा; मंत्री हसन मुश्रीफ यांची शिवारफेरी
Total Views: 16