बातम्या

हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय भारत समिटमध्ये आ. सतेज पाटलांची दमदार उपस्थिती!

A Satej Patils strong presence


By nisha patil - 11/14/2026 2:23:55 PM
Share This News:



हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय भारत समिटमध्ये आ. सतेज पाटलांची दमदार उपस्थिती!

 

हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय भारत समिटमध्ये आमदार सतेज पाटील यांनी विशेष सहभाग नोंदवला. तेलंगणा राज्य शासनाकडून त्यांना या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. न्याय, समता आणि जागतिक सहकार्याच्या नव्या दिशेचा शोध घेण्यासाठी आयोजित या परिषदेत काँग्रेसचे प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांच्यासह सतेज पाटील सहभागी झाले.

भारताची नव्या जागतिक व्यवस्थेतील भूमिका, युवकांचे नेतृत्व, परदेशस्थ भारतीयांशी संस्थात्मक संबंध आणि राज्याच्या विकासासाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी या महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित चर्चासत्रांमध्ये त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडले. यावेळी विविध देशांतील प्रतिनिधींशी विचारांची देवाणघेवाण करत जागतिक स्तरावर भारतीय समुदायाशी समन्वय अधिक दृढ करण्यावरही चर्चा झाली.

या आंतरराष्ट्रीय विचारमंथनाचा भाग होता आले, याचा विशेष आनंद असून अधिक न्याय्य, समताधिष्ठित आणि शांततापूर्ण जगाच्या निर्मितीसाठी हे विचारमंथन दिशादर्शक ठरेल, अशी भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.


हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय भारत समिटमध्ये आ. सतेज पाटलांची दमदार उपस्थिती!
Total Views: 11