बातम्या

‘सहकार भूषण’ पुरस्काराने आ. विनय कोरेंचा गौरव; सावर्डेत भव्य नागरी सत्कार!

A Vinay Kore honored with the Sahakar Bhushan


By nisha patil - 11/24/2026 6:24:06 PM
Share This News:



‘सहकार भूषण’ पुरस्काराने आ. विनय कोरेंचा गौरव; सावर्डेत भव्य नागरी सत्कार!

प्रतिनिधी उमेश पाटील सावर्डे तालुका हातकणंगले येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'सहकार भूषण' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार विनय कोरे यांचा सावर्डे येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि निस्वार्थ योगदानाबद्दल शासनाने त्यांचा हा गौरव केला असून, या पुरस्कारामुळे संपूर्ण वारणा परिसराचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
    या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर अशोक माने बापू उपस्थित होते. 
सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन आमदार विनय कोरे  याचा यथोचित गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने म्हणाले की, आमदार विनय कोरे यांनी सहकार चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेला 'सहकार भूषण' पुरस्कार ही त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती आहे.
 

सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ  विनय कोरे  भावूक झाले. ते म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सभासदांचा आणि वारणा परिसररातील ग्रामस्थांचा आहे. हा सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने समाजकार्य करण्याची नवी ऊर्जा देईल.
 या सोहळ्याला जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणआणा इंगवले,  माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, विद्यमान अर्थ व शिक्षण सभापती शीतल यादव, आळते जिल्हा परिषद सदस्या डॉ. वर्षा सावर्डेकर, व नेते मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन, कुंभोज, हिंगणगाव गाव चे युवा उद्योजक शशिकांत विलास माने, सावर्डे गावचे मानसिंग चव्हाण, नागेश नरंदेकर,संजय चव्हाण, ग्रामपंचायत चे  आजी-माजी सदस्य ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते व विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला मंडळ, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘सहकार भूषण’ पुरस्काराने आ. विनय कोरेंचा गौरव; सावर्डेत भव्य नागरी सत्कार!
Total Views: 17