बातम्या

crime news....कल्याण मटका जुगार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल १२१० रुपयांचा ऐवज जप्त.

A case has been registered against


By nisha patil - 10/7/2025 11:38:25 PM
Share This News:



कल्याण मटका जुगार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल १२१० रुपयांचा ऐवज जप्त.

पन्हाळा प्रतिनिधी,शहाबाज मुजावर कोतोली. ता, पन्हाळा : कल्याण मटका जुगार खेळवणाऱ्या इसमावर पन्हाळा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १० जुलै २०२५ रोजी, दुपारी २ वाजता सुमारास करण्यात आली.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद महादेव कांबळे (वय ५६, रा. दिगवडे, ता. पन्हाळा) हा सध्या कोतोली येथील सर्विसिंग सेंटर च्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर  चौकात कल्याण मटक्याचा जुगार घेताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपीकडून खालील प्रमाणे ऐवज जप्त केला आहे:
 

1. रोख रक्कम ₹५०० व ₹१०० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा मिळून आले दरम्यानच्या एकूण रक्कम ₹१२०० 

2. मटक्याच्या आकड्यांचे लिहिलेले स्लिप व त्यावर दिनांक १०/०७/२०२५ लिहिलेल्या २ चिठ्ठ्या व मटक्याचे पुस्तक व रेकॉर्ड
 

3. एक जुना वापरता ब्लॅक पेन एकूण मुद्देमाल असा एकूण ₹१२१०/- रुपये जप्त करण्यात आले आहे.
 

सदर आरोपी हा स्वःताचा फायदा करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन त्यांना सांगितलेल्या आकड्यांचे जुगार च्या चिट्ठी लिहून देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत या कारवाईमुळे पन्हाळा पोलिसांची कौतुक होत आहे. असेच कायदेशीर कारवाई  कायम व्हाव्यात अशा अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.ही कारवाई फौजदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमर शंकर माने पोलीस नाईक चव्हाण यांनी केली.


crime news...कल्याण मटका जुगार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल १२१० रुपयांचा ऐवज जप्त.
Total Views: 69