राजकीय

भव्य नवरात्र आरतीत सांस्कृतिक एकतेचा उत्सव

A celebration of cultural unity in the grand Navratri Aarti


By nisha patil - 10/10/2025 12:08:51 PM
Share This News:



 नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जोशी-गोंधळी समाजातर्फे आयोजित भव्य आरती आणि महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यास भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, तसेच युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाने समाजातील ऐक्य, भक्तीभाव आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम साकारला. नवरात्राच्या पवित्र वातावरणात झालेल्या या आरतीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या प्रसंगी समाज जिल्हा अध्यक्ष भरतराव काळे, बाळासो काळे, के. एम. चोगुले, अभिजित गजगेश्वर, आनंदराव वासुदेव, सुरेश पाटील, अनिल गजगेश्वर, राजू गजगेश्वर, शेकर चौगुले, गुरुनाथ कावडे, सुनील यादव, मीरासाहेब गजगेश्वर, विराज चिकलीकर, हेमंत आराध्ये, दुर्गेश लिंगराज, अमर मोरे, संदीप भरत काळे, सचिन भोळे, कुमार चौगुले, सुरेश चौगुले, मदन माने, सचिन धुर्वे, संदीप पाटील, अमोल सावंत यांच्यासह समाजातील इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भव्य नवरात्र आरतीत सांस्कृतिक एकतेचा उत्सव —
Total Views: 37