बातम्या

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी..

A close brother turned out to be a sworn enemy


By nisha patil - 5/29/2025 3:28:45 PM
Share This News:



सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी..

सहा लाखांची भावाच्या खुनाची सुपारी.

शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथे झालेल्या "अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील" या निमशिरगावच्या तरुणाच्या खुनाचा उलगडा झालाय. सख्ख्या भावानेच सहा लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी जीनगोंडा ओमगोंडा पाटील या मोठ्या भावासह,मोहन प्रकाश पाटील, राकेश उर्फ विनोद वसंत थोरात, किरण आमान्ना थोरात, सागर भीमराव लोहार, अमर रामदास वडर या सहा आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अविनाश उर्फ दीपक हा दारू पिऊन घरी भांडण करायचा, मुलांना पत्नीला मारहाण करत होता. त्यालाच कंटाळून त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे आरोपी जिनगोंडा पाटील यांनी  पोलिसांना सांगितले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पथक तसेच जयसिंगपूर पोलिसांनी केली.


सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी..
Total Views: 120