विशेष बातम्या
कोल्हापूरच्या खड्ड्यांना ‘रामराम’? एका सामान्य नागरिकाची तडफदार मोहिम सुरू!
By nisha patil - 11/22/2025 1:03:03 PM
Share This News:
कोल्हापूर : शहरातील रस्ते… खड्ड्यांनी विद्रूप झालेले! पावसाळ्यात तर हे खड्डे जीवघेणे ठरतात. बराच काळ लोकांनी केवळ तक्रारी केल्या, संताप व्यक्त केला… पण अखेर एका सामान्य कोल्हापूरकराने मात्र हातात खरोखरच काम घेतलं!
अरविंद रंगरेज यांनी आज सहकाऱ्यांसोबत स्वखर्चातून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहिम सुरू केली आहे.शिवाजी उद्यम नगरातून याची सुरवात झालीय
कोणतेही ठेकेदार नाहीत, कोणतीही योजना नाही… फक्त एक जबाबदार नागरिक आणि त्याच्यासोबत उभे ठाकलेले तरुण!
अरविंद रंगरेज यांच म्हणण आहे
“शहर आपलं… त्रास आपला… मग उपायही आपणच शोधला पाहिजे! आठवड्यातून एकदा कोल्हापुरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन खड्डे बुजवणार आहोत. कोल्हापूरकरांनी फक्त पाठिंबा द्यावा.”
या मोहिमेत त्यांचे सहकारी
शिवानंद पेडणेकर
मकरंद जामसांडेकर
प्रविण चोडणकर
श्रीधर बदी
निखिल नार्वेकर
अनुप पाटणकर
अभिषेक साने
यश बदी
आदित्य नार्वेकर
शैलेश राठोड
काशिनाथ जाधव
सहभागी झाले आहेत.
कोल्हापूरच्या खड्ड्यांना ‘रामराम’? एका सामान्य नागरिकाची तडफदार मोहिम सुरू!
|