राजकीय
प्रभाग १८ साठी ठोस विकास अजेंडा – स्मिता सावंत मांढरे यांचा २१ कलमी आराखडा”
By nisha patil - 1/13/2026 11:20:01 AM
Share This News:
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून उमेदवार स्मिता सावंत यांनी विकासाचा ठोस आणि कृतीक्षम आराखडा जाहीर केला आहे. केवळ रस्ते व गटारीपुरते मर्यादित न राहता आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षितता, स्वच्छता आणि डिजिटल प्रशासनावर भर देणारा २१ कलमी अजेंडा त्यांनी मांडला आहे.
नागरिकांच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल यंत्रणा, धुळ नियंत्रणासाठी डस्ट कलेक्टर, संवेदनशील भागात सीसीटीव्ही, शाळा सुधारणा, आरोग्य सुविधा बळकटीकरण आणि महिलांसाठी सुरक्षित व्यवस्था या मुद्द्यांचा आराखड्यात समावेश आहे.
प्रभागाचा समतोल विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद साधणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे स्मिता सावंत यांनी ठामपणे सांगितले आहे.
प्रभाग १८ साठी ठोस विकास अजेंडा – स्मिता सावंत मांढरे यांचा २१ कलमी आराखडा”
|