बातम्या
इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा
By nisha patil - 12/19/2025 6:39:43 PM
Share This News:
इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा;
आदित्य काळेंचा आमदार डॉ. राहुल आवाडेंकडून सन्मान
इचलकरंजी :- इचलकरंजी शहरातील शहापूर, सोलगे मळा परिसरातील सुपुत्र श्री. आदित्य विजय काळे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आदित्य काळे यांचा सन्मान केला व त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कठोर परिश्रम, जिद्द आणि देशसेवेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आदित्य काळे यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे इचलकरंजी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातील तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आदित्य काळे यांच्या देशसेवेच्या प्रवासाला शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा
|