ताज्या बातम्या
शाही दसरा महोत्सवानिमित्त गुरुवारी आराधना सांस्कृतिक कार्यक्रम, प्लास्टिक मुक्त पथनाट्याचे आयोजन
By nisha patil - 9/24/2025 6:08:20 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सवानिमित्त गुरुवारी आराधना सांस्कृतिक कार्यक्रम, प्लास्टिक मुक्त पथनाट्याचे आयोजन
कोल्हापूर, दि. 24 : यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवामध्ये कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचा समावेश केला आहे. त्यामुळे यावर्षीपासून कोल्हापूरचा दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानुषंगाने उद्या गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 पासून छत्रपती शाहू मिल येथे 100 दिवसांत प्लास्टिक मुक्त कोल्हापूर या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे.
दिनांक 25 सप्टेंबर रोजी होणारे कार्यक्रम-
गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 पासून 100 दिवसांत प्लास्टिक मुक्त कोल्हापूर या विषयावर पथनाट्य, छत्रपती शाहू मिल, कोल्हापूर तसेच सायं. 5.30 ते 6 पर्यंत कोल्हापूर पर्यटनबाबत सादरीकरण व सायं. 6 ते 9 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम-आराधना भाग-1, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तसेच शहरात दाखल होणाऱ्या सर्व भाविक- पर्यटकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
शाही दसरा महोत्सवानिमित्त गुरुवारी आराधना सांस्कृतिक कार्यक्रम, प्लास्टिक मुक्त पथनाट्याचे आयोजन
|