विशेष बातम्या

ग्रामीण सत्तेची रणघोषणा! १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना हिरवा कंदील

A declaration of rural power

By nisha patil - 12/17/2025 3:38:11 PM
Share This News:

ग्रामीण सत्तेची रणघोषणा! १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना हिरवा कंदील

महापालिकांनंतर आता राज्यातील ग्रामीण राजकारण पेटणार आहे. ओबीसी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा न ओलांडलेल्या कोल्हापूरसह १४ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल पुढील आठवड्यात फुंकला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या चौकटीत बसणाऱ्या जिल्ह्यांना निवडणुकीची मोकळीक मिळाली असून, आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या १८ जिल्हा परिषदांना मात्र ‘वेट अँड वॉच’ करावे लागणार आहे.

महापालिकांचे निकाल लागताच ग्रामीण भागात सत्तासंघर्षाला सुरुवात होणार — गावागावात राजकीय रणधुमाळी निश्चित!

ग्रामीण सत्तेची रणघोषणा! १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना हिरवा कंदील
Total Views: 38