बातम्या

कलासक्त परिवार आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या सुरेल मैफिली श्री किशोर घाटगे यांचा महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते सन्मान

A delightful musical evening on the occasion of Kojagiri Purnima


By nisha patil - 10/28/2026 1:56:18 PM
Share This News:



कलासक्त परिवार आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या सुरेल मैफिली श्री किशोर घाटगे यांचा महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते सन्मान

चंद्र चांदण्याच्या स्वागताला सुरांचा साज ही थीम घेऊन कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कलासक्त परिवाराच्या वतीने रंकाळा पदपाथ उद्यान येथे सुरमई संगीत गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम  यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शांतीदूत समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री किशोर घाटगे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम याने आजच्या धगधगीच्या जीवनात संगीत हे विरंगुळ्याचे साधन नसून आजच्या धकधकीच्या जीवनात एक गरज बनली आहे आणि प्रत्येकाने आज आपल्या आवड जपून या ठिकाणी सुरेल गीते सादर केली त्याचबरोबर श्री किशोर घाटगे यांचे 35 वर्षातील सामाजिक व राजकीय कलाक्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय आहे त्याचे अभिनंदन,यावेळी त्यांना गाणे म्हणण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी मैफिलीला अनुसरून गली मे आज चांद निकला व फिजा भी है जवा जवा ही गीते सादर केली या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नगरसेविका माधुरी किरण नकाते प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती शीला सोनुले,कलासक्त परिवाराचे डी एस साळुंखे नीलम काळे,अमित पाटील यासह गायक कलाकार व विविध मान्यवर उपस्थित होते.


कलासक्त परिवार आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या सुरेल मैफिली श्री किशोर घाटगे यांचा महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते सन्मान
Total Views: 8