बातम्या

 दाभोलकर खटल्यामध्ये खोटे कथानक उभे केले गेले! - प्रभाकर सूर्यवंशी 

A false narrative was created in the Dabholkar case


By nisha patil - 4/22/2025 8:41:55 PM
Share This News:



 दाभोलकर खटल्यामध्ये खोटे कथानक उभे केले गेले! - प्रभाकर सूर्यवंशी 

कोल्हापुरात ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात 

“हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ‘दाभोलकर हत्या’ प्रकरणात विक्रम भावे यांना बळीचा बकरा बनवले गेले आणि त्यांच्या आयुष्याशी उगाचच खेळ मांडला गेला. या खटल्यामध्ये खोटे कथानक उभे करून निर्दोषांना आरोपी ठरवले गेले आहे,” असा ठाम आरोप ‘आकार डि. जी. ९’चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला.

कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या विक्रम भावे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी श्री. सूर्यवंशी म्हणाले, “जोपर्यंत आपला शेवटचा श्वास चालू आहे, तोपर्यंत ‘गर्वसे कहो हम हिंदू है’, असे म्हणणे सोडू नका. हिंदूंनी अभिमानाने आपल्या धर्माची ओळख जपली पाहिजे.”

या कार्यक्रमात व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर,  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, लेखक विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट तसेच या प्रकाशन सोहळ्याला कोल्हापूर आणि परिसरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 दाभोलकर खटल्यामध्ये खोटे कथानक उभे केले गेले! - प्रभाकर सूर्यवंशी 
Total Views: 150