बातम्या

म्हाकवे ता. कागल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर शेतकरी मेळावा घेण्यात आला. 

A farmers' rally was organized by the Swabhimani Shetkari


By nisha patil - 10/22/2026 11:14:28 PM
Share This News:



म्हाकवे ता. कागल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर शेतकरी मेळावा घेण्यात आला. 

देशात साखरेची टंचाई निर्माण होत आहे यामुळे साखरेचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. साखरेचा किमान विक्री मुल्य ५० रूपये व सी हेव्ही इथेनॅाल ७० रूपये प्रतिलिटर करण्यात यावा ही मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. 

खते , किटकनाशके, बि बियाणे , औषधे , मशागती व मजूरी यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना यंदा किमान स्वाभिमानीने  ४५०० रूपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे. 

 कर्नाटक राज्यातील सरकार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन दराचा तोडगा काढत आहे. मात्र देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. 

   कारखानदार व सरकारने याबाबत तोडगा न काढल्यास आंदोलनाची तीव्रता अधिक होणार आहे याची नोंद घ्यावी. कागल तालुक्यात यंदा आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


म्हाकवे ता. कागल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर शेतकरी मेळावा घेण्यात आला. 
Total Views: 97