बातम्या
व्यंकटराव येथे आजरा येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा संपन्न
By nisha patil - 10/3/2026 3:35:12 PM
Share This News:
व्यंकटराव येथे आजरा येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा संपन्न
आजरा(हसन तकीलदार) :- येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा या प्रशालेमध्ये आजरा नगरीतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा संपन्न झाला.यामध्ये आजरा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली पण शिक्षणाची ओढ आणि भविष्यकाळात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण घेणारी एक ध्येयनिष्ठ मुलगी.. कुमारी स्नेहल दशरथ केसरकर चर्च गल्ली आजरा.हिचे रोझरी इंग्लिश स्कूल येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर बीएससी ऍग्री झाल्यानंतर आय.बी.पी.एस अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ग्राहक सेवा सहयोगी पदासाठी तिची निवड झाली.तीने घेतलेल्या कष्टाची चीज झाली.
या कष्टाने घेतलेल्या यशाचा सन्मान व्हावा आणि प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या डोळ्यासमोर एक गुणवंत विद्यार्थिनीचा आदर्श ठेवता यावा व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी प्राचार्य एम.एम. नागर्डेकर पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार यांचे हस्ते स्नेहलचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यासमोर बोलताना तिने सांगितले की सातत्यपूर्ण व समजावून घेऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने घेतलेले शिक्षण हेच यश मिळवून देते.. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींने आपले ध्येय निश्चित करावे आणि ध्येय पूर्तीसाठी झटावे. प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्की आहे. यशाला गवसणी घालणे सोपे जाते. त्याचप्रमाणे यशाचे मुलतंत्रही विद्यार्थ्यांना समजावून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. वाय. चौगुले व आभार डी. आर.पाटील यांनी केले.
व्यंकटराव येथे आजरा येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा संपन्न
|