ताज्या बातम्या

भाजपच्या विजयी सदस्यांचा 15 फेब्रुवारीला सत्कार सोहळा

A felicitation ceremony for the winning BJP members will be held on February 15


By Administrator - 2/14/2026 7:00:59 PM
Share This News:



भाजपच्या विजयी सदस्यांचा 15 फेब्रुवारीला सत्कार सोहळा

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा रविवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता भाजप जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.

भाजपचे पूर्व जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व पश्चिम जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली.

12 जिल्हा परिषद, 31 पंचायत समिती सदस्य विजयी

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपचे 12 सदस्य तर पंचायत समितीसाठी 31 सदस्य निवडून आले आहेत. पक्षाने लढवलेल्या 41 जागांपैकी 10 जागांवर अतिशय कमी मतांनी पराभव झाला आहे. तरीही हे यश पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार

विजयी उमेदवारांचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता भाजप जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


भाजपच्या विजयी सदस्यांचा 15 फेब्रुवारीला सत्कार सोहळा
Total Views: 11