बातम्या

आंदोलन अंकुशचा ठाम इशारा; किरकोळ दरवाढ करून कारखाने सुरू केल्यास आंदोलन तीव्र करणार...... 

A firm warning from Andolan Ankush


By nisha patil - 2/11/2026 6:23:21 PM
Share This News:



₹५ हजार पहिली उचल मिळाल्याशिवाय ऊसतोड सुरू होऊ देणार नाही
 

आंदोलन अंकुशचा ठाम इशारा; किरकोळ दरवाढ करून कारखाने सुरू केल्यास आंदोलन तीव्र करणार...... 
 

शिरोळ : प्रतिनिधी, आचिन हेरवाडे     आज 2/11/2026 रोजी शिरोळ शासकीय विश्रामगृह  येथे आंदोलन अंकुश संघटनेचे संस्थापक श्री. धनाजी चुंडमुगे यांनी पत्रकार परिषद बोलवली  होती... त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ₹५ हजार पहिली उचल मिळालीच पाहिजे, या मागणीवर आंदोलन अंकुश संघटना ठाम आहे. कारखानदारांनी प्रतिटन ₹३८०० ते ₹४००० दर देण्याची भूमिका मांडली असली, तरी या दराला संघटनेने कडाडून विरोध केला आहे. किरकोळ दरवाढ करून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुंडमुगे यांनी  मात्र, वाढता उत्पादन खर्च, खत-औषधांच्या किमती, मजुरी आणि शेती मशागतीचा खर्च लक्षात घेता हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे आंदोलन अंकुशच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
₹५ हजार पहिली उचल मिळाल्याशिवाय ऊसतोड सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका धनाजी चुंडमुगे यांनी मांडली. कारखानदारांनी किरकोळ वाढ करून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अंकुश त्याला मान्यता देणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ऊसतोड सुरू करू नये, असे आवाहनही करण्यात आले.

 

ऊस दराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी संघटना संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला...... यावेळी पत्रकार परिषदेत  त्यांनी  बोलताना सांगितले की५ नोव्हेंबरला भव्य मोटारसायकल रॅली
 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ₹५ हजार पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरोळ तालुक्यात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे

शिरोळ बाजार समितीत रात्री ९ ते १२ बैठक
रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीस कारखानदार प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, राहुल घाटगे, पंचगंगा साखर कारखान्याचे एम.डी. सावंत, सी.एस. पाटील, आदित्य पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच जवाहर, पंचगंगा, शरद आणि गुरुदत्त शुगरचे एम.डी. उपस्थित होते.

 

शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, आंदोलन अंकुशचे धनाजी चुंडमुगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील आणि सचिन शिंदे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.कारखानदारांनी ₹३८०० ते ₹४००० दर देण्याची भूमिका मांडली, तर आंदोलन अंकुशने ₹५ हजार पहिली उचल मिळावी, अशी मागणी कायम ठेवली. आहे  असे त्यांनी सांगितले. .


आंदोलन अंकुशचा ठाम इशारा; किरकोळ दरवाढ करून कारखाने सुरू केल्यास आंदोलन तीव्र करणार...... 
Total Views: 158