विशेष बातम्या
शिवशक राजदंड, स्वराज्यगुढी, आणि जिवंत देखाव्यांनी शिवराज्याभिषेक दिनास भक्तिभावाची साजेशी उजळणी!
By nisha patil - 6/6/2025 9:03:17 PM
Share This News:
कोल्हापूर, ६ जून: जिल्हा परिषदेच्या कागलकर वाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी, प्रतिमेचे पूजन, आणि शाहीर रंगराव पाटील यांचे जिवंत देखावे यामुळे हा सोहळा अधिकच प्रभावी झाला.
कार्यक्रमात राज्यगीत, राष्ट्रगीत, तसेच अफजलखान वध, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक सोहळा यांसारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचे देखावे सादर करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
“शिवशक म्हणजे रयतेचे आत्मभान” – या विचारातून शिवराज्याभिषेकाचा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या तत्वावर आधारलेला स्वराज्याचा सुवर्ण इतिहास जिवंतपणे उभा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब माळवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन एस. कार्तिकेयन यांनी केले.
शिवशक राजदंड, स्वराज्यगुढी, आणि जिवंत देखाव्यांनी शिवराज्याभिषेक दिनास भक्तिभावाची साजेशी उजळणी!
|