ताज्या बातम्या
कृष्णा हॉस्पिटल व आजी-माजी सैनिक संघटना शेंडूर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
By nisha patil - 5/1/2026 2:20:34 PM
Share This News:
शेंडूर:- (अजित बोडके)
कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर व आजी-माजी सैनिक संघटना शेंडूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेंडूर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांची हृदयरोग, रक्तदाब (बीपी) व मधुमेह (शुगर) यांसारख्या आजारांची तपासणी करून तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरामध्ये गरजू रुग्णांना मोफत औषधे तसेच काही महागड्या व महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या विनामूल्य करून देण्यात आल्या. तपासणीसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर येथील डॉ. दिनेश सिंग चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हृदयविकार, बीपी व शुगर यांसारख्या समस्या प्रामुख्याने दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे उद्भवतात. त्यामुळे वेळेवर व संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम केल्यास या आजारांवर नियंत्रण ठेवता येते, असा सल्ला त्यांनी दिला.
गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत पुढील काळात अशी मोफत आरोग्य शिबिरे वारंवार आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन आजी-माजी सैनिक संघटना शेंडूर यांच्या वतीने देण्यात आले.
या शिबिरावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कृष्णा हॉस्पिटल व आजी-माजी सैनिक संघटना शेंडूर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
|