बातम्या
*जेष्ठ नागरिकांना शासकीय माहिती देण्यासाठी तालुक्यात मेळावा घेणार-शशिकांत सावंत
By nisha patil - 8/1/2026 5:24:38 PM
Share This News:
*आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालयात सन्मान मिळणे करीता व शासनाच्या सेवा सुविधा समजून घेण्याकरीता तालुक्यात शासकीय अधिकारी समवेत जेष्ठ नागरिकांचा मेळावा घेणार असेलेचे मत पंचायत समितीचे निवृत अधिकारी शशिकांत सावंत यानी आजरा येथील जेष्ठ नागरीक संघटना बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
व्यकंटराव हायस्कूल येथे झालेल्या सभेत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरूजींच्या गिताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, प्रास्ताविक प्रा. सुरेश बुगडे यानी केले. जेष्ठ नागरीक सेवा संघाचे सचिव कृष्णा सुतार होनेवाडी यानी संघ कार्यकारणीचा परीचय करून देत, जेष्ठ नागरिकांचे गाव पातळीवर नियोजन व उपक्रम या संदर्भात माहीत दिली.
कॉ. शांताराम पाटील यांनी तालुक्यातील सर्व गिरणीकामगार हे जेष्ठ नागरिक असून शासकीय योजने बरोबर आरोग्य शिबीर घेऊन जेष्ठांचे प्रश्न समजावून घेणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष महादेव होडगे,सदाशिव वांजोळे, निवृती कांबळे यानीही आपली मनोगते व्यक्त के़ली. यावेळी जोतिबा जाधव, विजय पाटील, जानबा धडाम, लक्ष्मण गुरव, गोविंदा शेडे, चंद्रकांत सरबंळे, कॉ. संजय घाटगे याच्या सह जेष्ठ नागरिक उपस्थित होते आभार ईश्वर गिलबिले यांनी मानले.
*जेष्ठ नागरिकांना शासकीय माहिती देण्यासाठी तालुक्यात मेळावा घेणार-शशिकांत सावंत
|