बातम्या
या किरकोळ कारणावरून मुलीला बेदम मारहाण..
By Administrator - 9/18/2025 2:55:54 PM
Share This News:
या किरकोळ कारणावरून मुलीला बेदम मारहाण..
कुठे घडली घटना पहा..
सदाशिव पेठेत एमपीएससीची तयारी करणाऱ्या सहा तरुणींपैकी एकीला तिच्या रुममेट पाच जणींनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या घटनेने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात आलेल्या तरुणींवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ वर्षीय तरुणी वन रुम किचनमध्ये सहा जणींसोबत राहत होती. १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता स्वयंपाकघरातील बेसीन साफ केल्याच्या कारणावरून स्नेहल व इतर चार जणींनी तिच्यासोबत वाद घातला. सुरुवातीला शिवीगाळ करून भांडण झाले आणि त्यानंतर तिला भिंतीवर दाबून चापटा, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पीडित तरुणीने कसाबसा सुटका करून ११२ वर कॉल केला.
खडक पोलिस ठाण्यात पाच जणींवर गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. पाटील करत आहेत.
या किरकोळ कारणावरून मुलीला बेदम मारहाण..
|