बातम्या

आजरा परिवर्तन आघाडीमार्फत प्रभाग क्र.14मध्ये सवाद्य भव्य प्रचार फेरी

A grand campaign rally was held


By nisha patil - 11/28/2025 3:38:31 PM
Share This News:



आजरा परिवर्तन आघाडीमार्फत प्रभाग क्र.14मध्ये सवाद्य भव्य प्रचार फेरी
 

आजरा(हसन तकीलदार)*नगराध्यक्ष उमेदवार संजय भाऊ सावंत व नगरसेवक उमेदवार अभिषेक जयवंतराव शिंपी यांचे सह मतदार कार्यकर्ते व मान्यवर जेष्ठ मंडळी यांचे उपस्थितीत वॉर्ड क्र. 14 मध्ये भव्य प्रचार फेरी संपन्न झाली. यादरम्यान प्रभागातील सर्व उमेदवारांच्या घरी जाऊन उमेदवारांनी मतदानासंदर्भात सांगितले. त्याचप्रमाणे माहितीची परिपत्रके वाटप करण्यात आली.  

सवाद्य प्रचार फेरी दरम्यान उमेदवार ,कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एकंदरीत आजरा परिवर्तन विकास आघाडी मधील या प्रभागातून नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून अभिषेक जयवंतराव शिंपी यांना भरघोस मताधिक्य मिळणारच आणि या प्रभागाचा विकास करण्याची संधी निश्चित मिळणार असे वातावरण दिसले या प्रचार फेरीमध्ये   माजी जि.प.उपाध्यक्ष  जयवंतराव शिंपी, सौ.अलकाताई शिंपी, माजी उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत, माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे. दिग्विजय कुराडे, युवराज पोवार, कृष्णा पटेकर, विलास पाटील, सुनील पाटील, सचिन (भैय्या) शिंपी, ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळी सर्व प्रभागात उमेदवार व मतदार बंधू- भगिनी या प्रचारफेरीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजरा परिवर्तन आघाडीमार्फत प्रभाग क्र.14मध्ये सवाद्य भव्य प्रचार फेरी
Total Views: 293