बातम्या
निंगुडगे येथे अमृतेश्वर मंदिरात महाभिषेकाचा अनोखा सोहळा संपन्न
By nisha patil - 1/9/2025 1:00:43 PM
Share This News:
निंगुडगे येथे अमृतेश्वर मंदिरात महाभिषेकाचा अनोखा सोहळा संपन्न
आजरा (हसन तकीलदार ):- निंगुडगे गावच्या इतिहासात शेवटचा श्रावण सोमवार नक्किच सर्वांच्या स्मरणात राहणार.निंगुडगे गावचे ग्रामदैवत अमृतेश्वर आणि नवसाला पावणारा बसवाण्णा म्हणजे नंदी. या मंदिरात अमृतेश्वराला अनोखा आभीषेक सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापुर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे बंधु आणि विकास कामाच्या नियोजनाचे सर्वेसर्वा प्रा.अर्जून आबिटकर यांच्या शुभहस्ते व चंदडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधि सौ.भारतीताई यांच्या उपस्थितीत संजय स्वामींच्या मंत्रघोषात हा अभिषेक सोहळा संपन्न झाला.
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील विधानसभा निवडणुकीत निवडून यावेत व भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे नामदार व्हावेत म्हणून ग्रामस्थांनी अमृतेश्वर देवाजवळ रखवालीचा नारळ ठेवला होता. मागणी पूर्ण झाली म्हणून या महाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अर्जून आबिटकर, पुर्व विभागाचे भाजपा उपाध्यक्ष जयवंत सुतार , शिवसेनेचे विजय थोरवत(आम. आबिटकर समर्थक ),रणजित सरदेसाई (लाटगाव) इंद्रजित देसाई (वेळवट्टी),संतोष भाटले (आजरा),तसेच एम.टी.पाटील (सरोळी)धैर्यशील देसाई (दाभेवाडी) संजय जाधव (चंदगड ) यांच्या उपस्थितीत काही मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच हा नवस फेडीचा अभिषेक सोहळा पार पडला.
बसवंत नकलगे यांची पत्नी लक्ष्मीबाई नकलगे यांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन नॅब नेत्र रुग्णालय,मिरज व यशोदा फौंडेशन मलिग्रे सौजन्याने डॉ.सुदाम हरेर यांच्या विषेश प्रयत्नातून मोफत करण्यात आले. लक्ष्मीबाई नकलगे यांना नॅब संस्थेने ऑपरेशन सोबत जीवनावश्यक साहित्य,साडी चोळी व चेष्मा भेट देण्यात आला. या कामात सिद्धया स्वामी गुरुजी यानी विषेश सहकार्य केले.याबद्दल डॉ. सुदाम हरेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. सुदाम हरेर हे 2023 पासून नेसरी, गडहिंग्लज, आजरा, व चंदगड या भागामध्ये नॅब आय हॉस्पिटल मार्फत गरीब व गरजूसाठी नेत्र रुग्णासाठी अंधत्व निवारणाचे कार्य अविरतपणे करीत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन निंगुडगे गावच्या ग्रामस्थानी त्यांचा सत्कार प्रा.अर्जून आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्तावना व आभार माजी सरपंच सरदेसाई यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन सरपंच संभाजी सरदेसाई यांच्या ग्रुपने कले होते.
निंगुडगे येथे अमृतेश्वर मंदिरात महाभिषेकाचा अनोखा सोहळा संपन्न
|