राजकीय
आजरा साखर कारखान्याच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न
By nisha patil - 10/13/2025 5:43:24 PM
Share This News:
आजरा साखर कारखान्याच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे व महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या सहकार्याने ऊसपीक उत्पादन व सरासरी एकरी ऊस उत्पादन वाढीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आजरा जनता बँकेच्या सभागृहात भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. मागील काही वर्षापासून ऊसवीकासाच्या योजना बंद होत्या. परंतु कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी ऊसविकासाच्या तांत्रिक कार्यक्रमावर भर देऊन शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी ऊस विकासाच्या तांत्रिक कार्यक्रमावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार हा शेतकरी मेळावा संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई यांनी केले तर सूत्रसंचलन रमेश देसाई यांनी केले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई हे होते. तर डॉ. अशोक कडलक(प्रमुख शस्त्रज्ञ पीक उत्पादन व पीक संरक्षण विभाग व्ही. एस. आय.), बसवराज मस्तोळी(विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग), डॉ. कपिल सुशीर (वरिष्ठ शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग व्ही. एस. आय. आंबोली), यांनी मार्गदर्शन केले आणि प्रमुख वक्ते म्हणून जालिंदर पांगरे(जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी कार्यालय, कोल्हापूर), नामदेव परीट(कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी कार्यालय कोल्हापूर), किरण पाटील (उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज), भूषण पाटील(तालुका कृषी अधिकारी, आजरा) व विनय पोळ(भारती ग्रीनटेक प्रा. ली.)हे लाभले.
यावेळी ऊसपीक वाढीसाठी टीश्यू कल्चर रोपांची आवश्यकता, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे शेतीसाठी जमीन अपुरी पडत आहे, शेत जमीन वाढवू शकत नाही परंतु उपलब्ध क्षेत्रामध्ये आपण पिकांचे उत्पादन वाढवू शकतो. त्यासाठी ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शाश्वत ऊस उत्पादनासाठी, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीचा भौतिक, रासायनिक व जैवीक गुणधर्म समजून जमिनीतील कर्ब वाढवण्यासाठी तसेच रासायनिक व सेंद्रिय खतांचा समतोल वापर करण्यासाठी वापर करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर मातीपरीक्षण, रासायनिक खते व कीटक नाशकांचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. ए. आय. तंत्रज्ञानामुळे सर्व रोगांची, जीवनसत्वे पूरक माहिती, पाण्याचे प्रमाण जमिनीचा सामू याविषयी शेतकऱ्यांना सहज माहिती उपलब्ध होणार असले बाबत डॉ. अशोक कडलक यांनी सांगितले.
विनय पोळ यांनी सेंद्रिय खताविषयी माहिती दिली. बसवराज मस्तोळी यांनी शासनाच्या सर्व योजनांची माहिती देत सद्या ऊसाचे उत्पादन शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस विकासाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्याबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन मुकुंदादा देसाई, डॉ. कपिल सुशीर,किरण पाटील, जालिंदर पांगरे,भूषण पाटील आदींनीही उपस्थित शेतकरी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.शेवटी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांनी आभार मानले.
यावेळी आजरा करखान्याचे जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीभाऊ देसाई, संचालक दिगंबर देसाई, एम. के. देसाई, मारुती घोरपडे, रणजीत देसाई, रशीद पठाण,नामदेव नार्वेकर, रचना होलम, प्रगतशील शेतकरी संताजी सोले, अशोक गुरव, शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत, राजू होलम, कार्यकारी संचालक संभाजी सावंत,नंदकुमार देसाई, भिकाजी गुरव, अमित सामंत, परेश पोतदार, चीफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण, कार्यलयीन अधीक्षक अनिल देसाई, ऊस पुरवठा अधिकारी अजित (राजू)देसाई, ऊसविकास ऍग्रीओरसीअर अरुण माडभगत, संदीप कांबळे, बाळासो तांबेकर आदिसह शेती ऊस विकासचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्याच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न
|