बातम्या

शिक्षकांच्या कार्याचा गौरव ‘EMSA Inspire 2025’ द्वारे भव्य सन्मान सोहळा

A grand felicitation ceremony


By nisha patil - 5/9/2025 11:43:17 AM
Share This News:



शिक्षकांच्या कार्याचा गौरव ‘EMSA Inspire 2025’ द्वारे भव्य सन्मान सोहळा

 अमृता फडणवीस व मंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर  :शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन, कोल्हापूर तर्फे दरवर्षी आयोजित होणारा “EMSA Inspire 2025” हा भव्य सन्मान सोहळा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार असून, त्यांचे मोलाचे योगदान समाजापुढे आणण्याचा हेतू आहे.

हा सोहळा ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ४.०० वा. सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी सौ. अमृता देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाशराव आबिटकर गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित राहणार आहेत.


शिक्षकांच्या कार्याचा गौरव ‘EMSA Inspire 2025’ द्वारे भव्य सन्मान सोहळा
Total Views: 60