विशेष बातम्या

शहाजी महाविद्यालयात जेंडर इक्विटी विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न.

A guided lecture on the topic of gender equity was held at Shahaji College


By nisha patil - 8/8/2025 2:45:57 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात  जेंडर इक्विटी विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न.

श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथील Women Empowerment Cell अंतर्गत कार्यरत "सखी मंच" व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने "Gender Equity" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
       

कार्यक्रमाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. आर. के. शानेदिवाण सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. 
     

प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अर्चना जगतकर मॅडम (विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर) उपस्थित होत्या. त्यांनी जेंडर इक्विटी या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण संकल्पना विद्यार्थ्यांसमोर सखोलपणे मांडल्या.
 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरयू शेवडे यांनी केले. यावेळी IQAC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर सर, स्टाफ सेक्रेटरी वळवी ,प्रा. शरयू शेवडे,डॉ. के. म. देसाई ,डॉ. एस. ए. पाटील मॅडम,डॉ. काशिद-पाटील ,प्रा. सारिका मोरे,प्रा. प्रज्ञा भाटे यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम. व बीसीए विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


शहाजी महाविद्यालयात जेंडर इक्विटी विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न.
Total Views: 100