बातम्या

सुदृढ निरोगी समाज राष्ट्र उभारणीचा मुलाधार – एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

A healthy society is the foundation of nation building


By Administrator - 1/31/2026 5:34:45 PM
Share This News:



सुदृढ निरोगी समाज राष्ट्र उभारणीचा मुलाधार – एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
 

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी कार्यशाळा योजनेअंतर्गत “सुदृढ निरोगी समाज : राष्ट्र उभारणीचा मुलाधार” या विषयावर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता एक दिवशीय कार्यशाळा संपन्न होत आहे.
 

या कार्यशाळेमध्ये डॉ. संदीप पाटील, डॉ. शशिकांत पाटील आणि डॉ. प्रसाद सनगर हे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना निरोगी समाजाची संकल्पना, व्यसनमुक्त समाजाची गरज, ध्यान-आहाराचे महत्त्व तसेच मानसिक स्वास्थ्य या विषयांवर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.
 

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान हे उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. विजय देठे व प्रा. संतोष कांबळे यांनी केले आहे. सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक विचारांची पायाभरणी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


सुदृढ निरोगी समाज राष्ट्र उभारणीचा मुलाधार – एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
Total Views: 149