बातम्या
मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांचा हातभार : मदतीचा ट्रक २९ सप्टेंबरला रवाना
By nisha patil - 9/25/2025 3:01:07 PM
Share This News:
कोल्हापूर (दि. २५ सप्टेंबर) : मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी आवश्यक किराणा साहित्य, औषधे, कपडे, ब्लॅंकेट्स, पिण्याचे पाणी अशा जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
या मदतीचे संकलन आज दि. २५ सप्टेंबरपासून २८ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खर्डेकर चौक, कागल येथे केले जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचा ट्रक २९ सप्टेंबर रोजी रवाना होईल.
मदतीमध्ये गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर, चहा पावडर, मसाले, प्राथमिक औषधे, सॅनिटरी पॅडस, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, कपडे, ब्लॅंकेट्स, चटई, टॉवेल्स, टेनकोट्स, शालेय साहित्य तसेच बिस्किटे व स्वच्छतेचे साहित्य यांचा समावेश आहे.
या उपक्रमासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ आणि गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 91585 54787 / 70839 49908
मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांचा हातभार : मदतीचा ट्रक २९ सप्टेंबरला रवाना
|