विशेष बातम्या
तीन दिग्गज वादकांची जुगलबंदी — ‘ऑल टाईम हिट्स’ कार्यक्रम कोल्हापुरात
By nisha patil - 6/12/2025 4:18:03 PM
Share This News:
तीन दिग्गज वादकांची जुगलबंदी — ‘ऑल टाईम हिट्स’ कार्यक्रम कोल्हापुरात
मेंडोलीन, बासरी व हार्मोनियमच्या तालासुरांचा अद्भुत संगम
नाकोडा म्युझिक अकॅडमीचे प्रदीप राठोड आणि गायक नितीन सोनटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल टाईम हिट्स कार्यक्रमाची मैफिल कोल्हापूरकर रसिकांसाठी मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणार आहे.
या कार्यक्रमात मेंडोलीन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता, बासरीवादक किरण विणकर आणि हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांचे ताल–सूरांचे संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. या तीन दिग्गज कलाकारांसोबत स्थानिक वादकही सहभागी होणार असून निवेदन विश्वराज जोशी करणार आहेत. आयोजकांनी रसिकांना या संगीतमय मैफिलीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
तीन दिग्गज वादकांची जुगलबंदी — ‘ऑल टाईम हिट्स’ कार्यक्रम कोल्हापुरात
|