बातम्या
खासबागेत ९२ लाखांचा जंपिंग लॉन हवा! — कृती समितीचा सवाल
By nisha patil - 11/11/2025 5:02:03 PM
Share This News:
खासबागेत ९२ लाखांचा जंपिंग लॉन हवा! — कृती समितीचा सवाल
कोल्हापूर | प्रतिनिधी: राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ९२ लाख रुपये खर्चून बसवलेले जंपिंग लॉन कोठे गेले? असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर उपस्थित केला.
सार्वजनिक उद्यानं, जलतरण तलाव आणि खासबाग मैदानावर लाखो रुपये खर्चूनही ती ठिकाणं दुरवस्थेत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर प्रशासकांनी दोन दिवसांत पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले.
जुलै 2024 मध्ये 56 लाखांचा, आणि त्यापूर्वी 36 लाखांचा लॉन प्रकल्प राबवण्यात आला होता; मात्र आज त्या लॉनचा मागमूसही नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून काही अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी निधी खर्च केल्याचा आरोप समितीने केला.
समितीने इशारा दिला की,
“6 जानेवारी 2026 रोजी शाहू महाराज यांच्या वाढदिवशी कुस्ती स्पर्धा आयोजित करायची आहे. तोपर्यंत मैदान सुसज्ज नसेल, तर ठोस आंदोलन होईल!”
या प्रसंगी अशोक पोवार, रमेश मोरे, राजभाऊ मालेकर, प्रकाश आमटे, अमृत शिंदे, सुनीता पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
खासबागेत ९२ लाखांचा जंपिंग लॉन हवा! — कृती समितीचा सवाल
|