बातम्या
करूळ घाटात दरड कोसळली...
By nisha patil - 4/9/2025 3:29:00 PM
Share This News:
करूळ घाटात दरड कोसळली...
गगनबावडा–वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प
गगनबावडा–वैभववाडी मार्गावर करूळ घाटातील वैभववाडी हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात राडारोडा पसरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सध्या दोन JCB च्या साहाय्याने राडारोडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
करूळ घाटात दरड कोसळली...
|