शैक्षणिक
शहाजी मध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने शोध स्वतःचा वर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 7/25/2025 9:28:37 PM
Share This News:
शहाजी मध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने शोध स्वतःचा वर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर:श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मानसशास्त्र विभाग आयोजित विशेष व्याख्यान आजचा युवक "शोध स्वतःचा" या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर दीपक सावंत समुपदेशक सीपीआर कोल्हापूर उपस्थित होते.
त्यांनी आपल्या मनोगतात आजचा युवक आणि आणि सद्यस्थिती यावर प्रकाश टाकला आजचा युवक अनेक प्रकारच्या मानसिक भावनिक आणि सामाजिक समस्येमध्ये गुरफटलेला आहे यातून त्याला बाहेर पडण्यासाठी स्वतःचा योग्य प्रकारे शोध घेणे अपेक्षित आहे यावर त्यांनी आपले मार्मिक विवेचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण सर उपस्थित होते.
याशिवाय डॉ.आर. डी. मांडणीकर आय. क्यू. ए. सी. समन्वयक, डॉ. डी. के. वळवी स्टाफ सेक्रेटरी आणि सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. ए. बी. बलुगडे यांनी केले. डॉ. के एम देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले.
शहाजी मध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने शोध स्वतःचा वर व्याख्यान संपन्न
|