बातम्या
व्यंकटराव हायस्कूलमध्ये वकील बार असोसिएशन तालुका विधी सेवा समिती आजरा व व्यंकटराव शिक्षण संकुल यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न
By nisha patil - 10/31/2026 9:19:20 PM
Share This News:
व्यंकटराव हायस्कूलमध्ये वकील बार असोसिएशन तालुका विधी सेवा समिती आजरा व व्यंकटराव शिक्षण संकुल यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न
*आजरा(हसन तकीलदार):- व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा व वकील बार असोसिएशन तालुका विधी समिती आजरा यांचे संयुक्त विद्यमाने व्यंकटराव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.आर.पोवार यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना महिला कायदे वारसा हक्क जमीन कायदे व शिक्षणाचा हक्क हा मूलभूत अधिकार, फौजदारी कायदे ,दिवाणी कायदे, याविषयी माहिती सांगितली. व लैंगिक आकर्षणापासून दूर रहावे,बालविवाहचा विरोध करावा अशी भावनिक साद घातली.श्रीमती एडवोकेट सुनिता पाटील यांनी "माझे शरीर माझी सुरक्षा" यांविषयी माहिती व मार्गदर्शन केले. तर पोक्सो कायदा व चाइल्ड हेल्पलाइन नंबर याविषयीची माहिती एडवोकेट एस.आर.चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयंतराव शिंपी, प्राचार्य एस. एन.पाटील,पर्यवेक्षिका व्हि.जे.शेलार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. न्यायमूर्ती आर.पी. थोरे व आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय पवार यांचा सत्कार व स्वागत आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. एडवोकेट आजगेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन व आभार डी.आर.पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आजरा बार असोसिएशनचे सर्व एडवोकेट, प्रशालेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये वकील बार असोसिएशन तालुका विधी सेवा समिती आजरा व व्यंकटराव शिक्षण संकुल यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न
|