शैक्षणिक
कोरगांवकर हायस्कूलमध्ये संसदीय लोकशाहीचं जिवंत प्रात्यक्षिक
By nisha patil - 7/21/2025 2:41:06 PM
Share This News:
कोरगांवकर हायस्कूलमध्ये संसदीय लोकशाहीचं जिवंत प्रात्यक्षिक
कोरगांवकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी रचली "लोकशाहीची शाळा"
कोल्हापूरमधील आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कोरगांवकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शालेय जिमखाना निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकशाही अनुभवली. मतदार यादी, ओळख पटवणे, मतदान प्रक्रिया, मतमोजणी अशा साऱ्या टप्प्यांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संसदीय लोकशाहीचे धडे गिरवले. निवडणूक आयुक्ताच्या भूमिकेत सदाशिव हाटवळ, पर्यवेक्षिका सुरेखा पोवार, मुख्याध्यापक संजय सौंदलगे व इतर शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. निवडणूक आचारसंहितेचे पालन करत पार पडलेली ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सजग नागरिक होण्याचा पाठ ठरली.
कोरगांवकर हायस्कूलमध्ये संसदीय लोकशाहीचं जिवंत प्रात्यक्षिक
|