बातम्या
प्रेमाचा त्रिकोण ..अन् जिवलग मित्राची हत्या.
By nisha patil - 7/6/2025 4:08:28 PM
Share This News:
प्रेमाचा त्रिकोण ..अन् जिवलग मित्राची हत्या.
दोघांचा एकीवरच जडला जीव.
प्रेमाच्या त्रिकोणातून जिवलग मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना करवीर तालुक्यातील केर्ले गावात उघडकीस आलीय. महेंद्र प्रशांत कुंभार या 18 वर्षाच्या तरुणाचा खणीमध्ये ढकलून खून करण्यात आलाय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी व मयत महेंद्र कुंभार हे दोघे एकाच मुलीवर प्रेम करत होते. आरोपीच्या प्रेमात महेंद्र अडथळा ठरत होता.या कारणामुळे सुशांतची हत्या केल्याचं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं.
प्रेमाचा त्रिकोण ..अन् जिवलग मित्राची हत्या.
|