राजकीय
नादवडे येथे मनसे उमेदवार युवराज येडुरे यांची जोरदार सभा; रेल्वे इंजिनवर बटन दाबून मतदानाचे आवाहन
By nisha patil - 10/2/2026 10:37:19 AM
Share This News:
नादवडे येथे मनसे उमेदवार युवराज येडुरे यांची जोरदार सभा; रेल्वे इंजिनवर बटन दाबून मतदानाचे आवाहन
कुर पंचायत समिती मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार युवराज येडुरे यांनी काल नादवडे येथे जाहीर सभा घेऊन मतदारांना रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले. या सभेला नादवडे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

सामान्य कुटुंबात जन्माला आलेले युवराज येडुरे यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी पंप, शेती साहित्य यांचे वाटप करून सातत्याने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे त्यांची कुर मतदार संघातील शेतकऱ्यांशी घट्ट नाळ जोडलेली आहे. उमेदवार असो वा नसो, कृषी विषयक योजनांची माहिती देणे तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवणे हे कार्य त्यांनी कायम सुरू ठेवले असल्याने मतदार संघात त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

आज तळागाळातील शेतकरी, महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने युवराज येडुरे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे या सभेत स्पष्टपणे दिसून आले. शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकास यावर त्यांनी मांडलेली भूमिका उपस्थितांना भावली. त्यामुळे या मतदार संघात विजयाचा गुलाल युवराज येडुरे यांनाच लागेल, असे वातावरण तयार झाल्याचे चित्र या सभेतून दिसून आले.
या सभेला शेतकरी वर्गासह महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नादवडे येथे मनसे उमेदवार युवराज येडुरे यांची जोरदार सभा; रेल्वे इंजिनवर बटन दाबून मतदानाचे आवाहन
|