बातम्या

राज्यातील रखडलेल्या प्राध्यापक भरती संदर्भात नवनिर्वाचित पुणे पदवीधर आमदार हर्षदाताई देशमुख जाधव यांना संघर्ष समिती मार्फत निवेदन सादर

A memorandum regarding the stalled recruitment


By nisha patil - 7/11/2026 11:03:51 PM
Share This News:



राज्यातील रखडलेल्या प्राध्यापक भरती संदर्भात नवनिर्वाचित पुणे पदवीधर आमदार हर्षदाताई देशमुख जाधव यांना संघर्ष समिती मार्फत निवेदन सादर
 

*आजरा(हसन तकीलदार):- राज्यातील रखडलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ प्राध्यापक भरती संदर्भातील अंतिम टप्पा मुलाखत कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्यासंदर्भातील मागणी करणारे निवेदन काल पदवीधरचे नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख -जाधव यांना संघर्ष समितीच्या वतीने समन्वयक प्रा. जोतीराम सोरटे यांनी दिले.
     

११ फेब्रुवारी २०२६ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ प्राध्यापक पदांच्या भरती संदर्भात जीआर काढला. त्यानंतर सदर भरती प्रक्रिया जून २०२६ पूर्वी पूर्ण करून शैक्षणिक वर्ष २०२६ / २७ ह्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस नवीन प्राध्यापक शिकवणेसाठी महाविद्यालयांना उपलब्ध असतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत  पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. त्यानंतर आज तागायत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत  प्राध्यापक भरती प्रक्रिया रडखडलेलीच आहे. ह्या रखडलेल्या भरती प्रक्रियेतील अंतिम टप्पा मुलाखत कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्या संदर्भातील प्रश्न विधानपरिषदेत मांडावा व त्यावर चर्चा घडवून आणावी ह्या मागणीचे निवेदन पदवीधर आमदार हर्षदा देशमुख यांना संघर्ष समितीच्या वतीने समन्वयक जोतीराम सोरटे यांचेवतीने देण्यात आले. याप्रसंगी डॉ. अरुण नलवडे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
 
" यावेळी प्रतिक्रिया देताना आम. हर्षदा देशमुख - जाधव म्हणाल्या की,रखडलेल्या ५०१२ प्राध्यापक भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा मुलाखत कालबद्ध मर्यादेत पूर्ण करणेसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न विधानपरिषदेत प्राधान्याने मांडणार "


राज्यातील रखडलेल्या प्राध्यापक भरती संदर्भात नवनिर्वाचित पुणे पदवीधर आमदार हर्षदाताई देशमुख जाधव यांना संघर्ष समिती मार्फत निवेदन सादर
Total Views: 11