बातम्या

लोकनेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू 

A memorial and statue befitting the reputation


By Administrator - 3/19/2026 5:31:39 PM
Share This News:



लोकनेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू 
        
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून के एस बी पी चौकातील जागेची पाहणी

         
कोल्हापूर दि. १९: लोकनेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्व आणि लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी के एस बी पी चौकातील जागेची पाहणी खाली.          
 

 

यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर सौ. रुपारणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, भाजपाचे गटनेते मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, कोल्हापूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दिंडे, नगर रचनाकार रमेश मस्कर आदी प्रमुखांची उपस्थिती होती. 


लोकनेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू 
Total Views: 14