बातम्या
कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 2/5/2025 9:51:50 PM
Share This News:
कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापुरात "तेजोमय तेजोनिधी" या सावरकर गीतांवरील भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात दीपप्रज्वलन, सावरकर रचित गीतांवरील नृत्याविष्कार, आणि शरद पोंक्षे यांच्या प्रभावी सूत्रसंचनाचा समावेश होता.
स्मारकात हॉल, ग्रंथालय, अभ्यासिका व वीर सावरकरांचे म्युरल्स असणार असून, यामुळे युवापिढीला प्रेरणा मिळेल, असे क्षीरसागर यांनी सांगितले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर, संस्था प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार – आमदार राजेश क्षीरसागर
|