बातम्या

गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय : सीपीआर रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा शुभारंभ

A new chapter in healthcare for the poor


By nisha patil - 10/28/2025 5:28:35 PM
Share This News:



गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय : सीपीआर रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा शुभारंभ

सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अत्याधुनिक एमआरआय, सिटी स्कॅन, मॅमोग्राफी आणि अल्ट्रासोनोग्राफी या यंत्रसुविधांचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला.

त्याचबरोबर सीपीआरमधील अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील ऑडिटोरियमचे उद्घाटन देखील या वेळी करण्यात आले.

कोल्हापूरसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल होत असतात. या रुग्णांना विविध तपासण्यांसाठी आता बाहेर धावपळ करावी लागणार नाही, कारण सर्व सुविधा रुग्णालयातच उपलब्ध होणार आहेत.

अत्यल्प खर्चात या तपासण्या होणार असल्याने गोरगरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे. महायुती सरकार भविष्यातही दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक आदिल फरास, अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, तसेच सीपीआरमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमल महाडिक यांच्या पुढाकाराने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात कोल्हापुरात होत असलेली ही सकारात्मक भर घरोघरी पोहोचावी, हीच अपेक्षा!


गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय : सीपीआर रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा शुभारंभ
Total Views: 41